राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त केल्याची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनुसार पक्षातील सर्व विभाग आणि सर्व सेल बरखास्त करण्यात आल्याची घोषणा करण्यात आल्याचं एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयाने या माहितीला दुजोरा दिला आहे. 

निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली असून त्याचाच एक भाग म्हणून पक्षाचे सगळे सेल देखील बरखास्त करण्यात आले आहेत.

पक्षाच्या या पदांवर लवकरच नवीन नियुक्त्या होण्याची शक्यता आहे. या बरखास्तीचे पत्र  पक्षाच्या सगळ्या सेलच्या प्रमुखांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेल यांच्याकडून पाठवण्यात आलं आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या