‘पावले’ चालती भाजपाची वाट...

मुंबई - बाळासाहेब होते, तेव्हा शिवसैनिकांना आंदोलन करायला परवानगी घ्यायला लागत नव्हती. बाळासाहेबांचा नेहमीच आम्हाला आशीर्वाद असायचा. पण, आता आंदोलन करायचं, तर आधी 'छोटे सरकार' आणि 'युवराज' म्हणजे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या खास मंडळींना मातोश्रीतल्या चौथ्या मजल्यावर माहिती द्यावी लागते. ही मंडळी मग आदित्य ठाकरे यांना ती माहिती देतात आणि मग आंदोलन करायचं की नाही, याचा मेसेज येतो. ही माहिती दिलीये युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्य अमर पावले यांनी. म्हणूनच पावले यांची पावले आता भाजपात पडणार आहेत. अमर पावले यांची शिवसेनेतली ही दुसरी पिढी. कट्टर शिवसैनिक असलेले पावले सोमवारी लालबागमध्ये समर्थकांसह भाजपामध्ये दाखल होत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मित्रपक्षानं दिलेला हा मोठा धक्का मानला जातोय. 

काय म्हणतात पावले?

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासोबत गुजराती आणि अमराठी मित्रांचा गोतावळा आहे. इतर पक्षांतून आलेल्यांचीही युवासेनेत लुडबूड वाढली आहे. याबाबत मी फेसबुकवर लिहिल्यावर पक्षातून हकालपट्टी झाली. त्यामुळेच आता समर्थकांसह भाजपात प्रवेश करत आहोत.

पुढील बातमी
इतर बातम्या