शिवसेनेने पाठिंबा मागितला तर विचार करू - अशोक चव्हाण

नरिमन पॉइंट - शिवसेना-भाजपा राज्याच्या सत्तेत असून शिवसेना आणि भाजपाने ठरवले तर मुंबई महापालिकेतही ते एकत्र येतील. शिवसेना जर सत्तेतून बाहेर पडली आणि पाठिंबा मागितला तर आम्ही विचार करू, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. शनिवारी गांधी भवनमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. मात्र युतीबद्दल कोणताच विचार केला नसल्याचं शुक्रवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. मात्र सत्तेसाठीची मॅजिक फिगर गाठण्यासाठी शिवसेनेने जिंकलेल्या बंडखोर उमेदवारांना पुन्हा शिवसेनेत घेतले आहे. काँग्रेसच्या या नवीन ऑफरबद्दल शिवसेनेने अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या