मोठी अपडेट : बाबा सिद्दिकींवर गोळीबार करणारे आरोपी कोण?

Photo by - sab se tezz
Photo by - sab se tezz

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. 

बाबा सिद्दिकी वर हल्ला करणारे एकूण तीन जण होते. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक आरोपी उत्तर प्रदेश मधील आहे. तर, दुसरा हरियाणाचा आहे. तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका चॅनेल ला यासंदर्भात माहिती दिली आहे. 

बाबा सिद्दिकी यांचे पूत्र झिशान सिद्दीकी (baba siddique Firing) यांच्या कार्यालयाबाहेर साधारण आठ ते साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या छातीत तीन गोळ्या घुसल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते. येथील खेरवाडी जंक्शनजवळ असणाऱ्या सिग्नलवर बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, तीन व्यक्तींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला आणि ते पसार झाले. 

बाबा सिद्दिकी यांना गोळीबार झाल्यानंतर लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना तीन गोळ्या लागल्या होत्या. छाती आणि डोक्याच्या जवळ त्यांना गोळ्या लागल्या होत्या. 

बाबा सिद्दिकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर बाबा सिद्दिकी यांना पोलिसांकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यानुसार बाबा सिद्दिकी यांच्यासोबत एक पोलीस कॉन्स्टेबल तैनात असायचा. 

पुढील बातमी
इतर बातम्या