बहुजनांच्या संरक्षणासाठी मुंबईत मुकमोर्चा

मुंबई - बहुजनांच्या संरक्षणासाठी मुंबईत जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मुक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चात सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत, अशी माहिती मुंबई बुहजन क्रांती मुक महामोर्चाच्या समिती तर्फे देण्यात आली. या महामोर्चासाठी वेगवेगळ्या पक्षाच्या आणि संघटनेच्या नेत्यांची संयोजक समिती गठीत करण्यात आलीय. हा महामोर्चा कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. या विराट मोर्चाचे नेतृत्व प्राधान्यानं महिला आणि तरूण मुली करणार आहेत. पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. 

या पत्रकार परिषदेला साहित्यिक अर्जुन डांगळे, आनंदराज आंबेडकर, आमदार भाई गिरकर, चंद्रकांत हंडोरे, माजी पोलीस अधिकारी वाय.सी. पवार, अविनाश मातेकर, बाबुराव माने, नवी मुंबईचे महापौर अविनाश लाड उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या