राज्यात निवडणुकीच्या काळात ओपिनियन आणि एक्झिट पोलवर बंदी

भारतीय निवडणूक आयोगाने 2024च्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणुकीच्या काळात ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल दाखवण्यास बंदी घातली आहे.

16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू

महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार असून त्यानुसार 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 1 जून 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत एक्झिट पोलवरील बंदी लागू राहील.

त्याचप्रमाणे, प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्यापूर्वी 48 तासांच्या आत ओपिनियन पोल किंवा इतर मतदान सर्वेक्षणांचे निकाल प्रसिद्ध करण्यास किंवा प्रसारित करण्यास बंदी असेल, असे निवडणूक आयोगाने एका अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.


हेही वाचा

दृष्टीहीन मतदारांसाठी ऑडिओ आणि ब्रेल लिपीचा वापर करण्यात येणार

Lok Sabha Elections 2024: जागावाटपावरून शिंदे गटनेत्याचा भाजपला इशारा

पुढील बातमी
इतर बातम्या