भाजपनंच तोडलं भाजप प्रदेश कार्यालय

नरिमन पॉइंट - नरिमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालय भाजपनेच तोडलंय. नरिमन पॉइंट येथील उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील प्रदेश कार्यालयात केलेले अतिरिक्त बांधकाम तोडण्यासाठी न्यायालयाने दिलेली मूदत संपली होती. याची दखल घेत पालिकेनं भाजपला नोटीस बजावली होती. त्यामुळे न्यायालयाकडून कारवाई होऊ नये आणि निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना मुद्द मिळू नये म्हणून भाजपनं स्वत:च ही कारवाई केली. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत पालिकेनं भाजप प्रदेश कार्यालयावर कारवाई करावी, असा पवित्रा शिवसेनेनं घेतला होता. दरम्यान न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेतत आम्हीच स्वत: ही कारवाई केल्याचं प्रवक्ते माधव भंडारी सांगितलंय. नरिमन पॉइंट येथील नेहरू उद्यानालगतच्या परिसरात १९७७-७८ च्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाने एमटीडीसी, सेवा योजक कार्यायल, माविम, जनता दल, भाजप यांसह काही संस्थांना कार्यालयासाठी जागा उपलब्ध केली होती. उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर ही कार्यालये उभी असल्यामुळे ती हटविण्यात यावीत यासाठी नरिमन पॉइंट सिटिझन संस्थेनं न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या