भाजपाच्या प्रचारासाठी अभिनेता मनोज तिवारी घाटकोपरमध्ये

घाटकोपर - मुंबईत बिहारींची वाढती संख्या लक्षात घेऊन भाजपाने भोजपुरी अभिनेता आणि भाजपा खासदार मनोज तिवारी यांची घाटकोपर पूर्वमध्ये रमाबाईनगर येथे सभा घेतली. या वेळी मनोज यांनी प्रभाग 125 मधल्या भाजपाच्या उमेदवार साक्षी पवार आणि प्रभाग 133 मधील भाजपाचे उमेदवार रत्नम देवेंद्र या दोन्ही उमेवारांचा प्रचार केला. या सभेला भोजपुरी अभिनेत्री शुभी शर्मा, रिपाइं(ए) आणि रासप शिवसंग्राम महायुतीचे नेते मंडळी उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या