भाजपा व मनसे युतीला पुर्णविराम; मनसेशिवाय निवडणूक लढविण्याचा भाजपाचा निर्णय

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा व मनसे यांची युती होणार असून, एकत्रित निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. मागील २ ते ३ महिन्यांपासून मनसे-भाजपमध्ये युतीची चर्चा सुरु होती. मात्र, या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेशी युती न करण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर शिक्कामोर्तब केलं आहे. मनसे सोबत युती होणार नाही, हा विषय आमच्यासाठी आणि राज ठाकरेंसाठी संपला आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत चर्चा नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं. गेल्या निवडणुकीच्या वेळेसच आमचाच महापौर झाला असता, मात्र अमीत शाहा यांनी सांगितलं की शिवसेनेला द्या. पण आता तसे होणार नाही, यावेळी मुंबईत भाजपचा महापौर होणार आहे.

११७ पेक्षा जास्त जागा जिंकून मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. बाळासाहेबांचं स्मारक शिवसेनेला जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं, काहीही बोलू नका, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावाला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, तुमचं हिंदुत्व काँग्रेसला देखील सांगा, उगाच हिंदुत्वाचा आव आणू नका. 

पुढील बातमी
इतर बातम्या