मुंबईतील लोकल, बस बंद करा, पंकजा मुंडे यांची मागणी

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबईतील लोकल, मेट्रो आणि बस सेवा बंद करण्याचं आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सरकारी कार्यालये पुढील ७ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी मुंबईतील लोकल, बस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. 

पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियार व्हिडिओ अपलोड करून संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मुंबईत अत्यंत कमी क्षेत्रफळात मोठ्या संख्येने लोकसंख्या राहते. अशा स्थितीत कोरोना व्हायरसची लागण १ टक्का लोकांना जरी झाली. तरी तो मोठा आकडा असू शकातो. लोकल ट्रेन, बस मध्ये प्रवासी अक्षरश: लटकून प्रवास करतात. त्यांना अटकाव करण्याची गरज आहे.

शाळा काॅलेजांना सुटी दिल्याने, कामगारांना वर्क फ्राॅम होमची मुभा दिल्याने काही जण फिरण्यासाठी बाहेर निघाले आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी वाहतूक व्यवस्थेला आळा घालण्याची गरज असल्याचंही मुंडे यांनी सांगितलं.   

पुढील बातमी
इतर बातम्या