भाजपाचे शक्तीप्रदर्शन

भाजपा सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी अमित शाह यांनी मुंबईमध्ये येताच दादरच्या शिवाजी पार्क परिसरात असलेल्या शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याळाला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर शिवाजी पार्कात असलेल्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. त्याबरोबर त्यांनी चैत्यभूमीलाही भेट दिली. सावरकर स्मारकात असलेल्या स्वा. सावरकर यांच्या पुतळ्याला यावेळी त्यांनी पुष्पहार देखील अर्पण केला. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, रावसाहेब दानवे, विनोद तावडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार तमिल सेल्व्हन आदी भाजपचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.

शिवसेना भाजपामधील राजकीय संबंधांवर चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी अमित शाह मुंबईत दाखल झाले. पण ते यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतील का अशी चर्चा सध्या राजकिय वर्तुळात रंगली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाचे 82 नगरसेवक निवडून आले आहे. मुंबईतील भाजपाची ताकद वाढल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करत एकप्रकारे भाजपाने शक्तीप्रदर्शनचे केले, असं म्हटले जात आहे. 

प्रभागांतील जाणकार, तज्ज्ञांशी साधणार संवाद -

सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यामुळे मुंबईत निवडून आलेल्या 82 नगरसेवकांसह इतर प्रभागांमधील जाणकार, तज्ज्ञ यांच्यासोबत चर्चा करून ते सरकारच्या भविष्यातील योजनांची माहिती त्यांना देणार आहेत, तसेच या सरकारच्या विविध विभागांतील लोकप्रतिनिधींच्या कामांबाबतची अपेक्षाही जाणून घेणार आहेत. यासाठी भाजपाने आपल्या 82 नगरसेवकांना आपल्या प्रभागातील डॉक्टर, वकील, अभियंता, तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ अशाप्रकारे एएलएम आणि एनजीओच्या लोकांशी संवाद साधण्यास सांगितले आहे. येत्या रविवारी 18 जून रोजी कूपर रुग्णालयासमोरील जे. बी. हॉलमध्ये शाह सुमारे 10 हजाराहून अधिक प्रतिष्ठीत नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये विशेषत: नगरसेवक, आमदार आणि खासदार आदी लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचा आढावाही या लोकांकडून ते जाणून घेणार असल्याचे समजते. यासाठी एनजीओ तसेच एएलएमसह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विचारवंतांना कार्यशाळेसाठी भाजपाने आवताण पाठवले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या