अमित शाह उद्धव ठाकरेंच्या भेटीला, युतीसाठी चर्चा होण्याची शक्यता

येत्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेला गोंजरण्याचं काम सध्या भाजपकडून सुरू असल्याचं दिसत आहे. त्यातच आता थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह बुधवारी संध्याकाळी 6 वाजता मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान युतीबाबत चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे.

अमित शाह मुंबई दौऱ्यावर

संपर्क अभियानांतर्गत अमित शाह हे मुंबईत दौऱ्यावर येणार आहे. या भेटीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युतीबाबतची प्राथमिक चर्चा होऊ शकते. 

शिवसेना टाळी देणार का?

सोमवारी झालेल्या राज्यस्तरीय भाजप बैठकीत शिवसेनेला बरोबर घेण्याचे प्रयत्न करणारे सूर ऐकू येत होते. तर दुसरीकडे शिवसेनेनं ताकद दाखवल्यानंतर अमित शहांना मातोश्रीवर यावसं वाटलं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

पालघर निवडणुकीनंतर अमित शहा यांना भेटवसं वाटलं, पण सेना पक्षप्रमुख मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. या भेटीच्या माध्यमातून भाजप मित्रपक्ष शिवसेनाला एकप्रकारे टाळी देणार का? आणि भाजप आणि शिवसेना गळ्यात गळा घालून 2019 निवडणुका लढणार का? हे बुधवारी होणाऱ्या भेटीत स्पष्ट होणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या