अमित शहा-भागवत यांच्यात गुफ्तगू

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची शुक्रवारी भाईंदंर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी इथं भेट झाली. सकाळी या दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. असं असलं तरी राम मंदिर आणि ५ राज्यातील निवडणुकांविषयी चर्चा झाल्याचं समजत आहे.

काय चर्चा झाली?

अमित शहा हे शुक्रवारी मध्यरात्री २ वाजता मुंबईत आले. मुंबईत आल्याबरोबर ते रामभाऊ म्हाळगीकडे रवाना झाले. सकाळी भागवत आणि शाह यांच्यामध्ये बैठक झाली. राम मंदिरचा मुद्दा आरएसएसनं उचलून धरला आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिर उभारणीसाठी आतापर्यंत काय काय केलं? त्यावर पक्षाची भूमिका काय यावर यावेळी चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सर्वांचं लक्ष याकडे

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून काय संघटनात्मक बांधणी करण्यात आली? यावर ही चर्चा झाली असावी, असं म्हटलं जातं आहे. पण नेमकी चर्चा काय झाली? हे अधिकृतरित्या समोर आलेलं नाही. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष लागल आहे ते दुपारी होणाऱ्या भागवत यांच्या पत्रकार परिषदेकडे.

पुढील बातमी
इतर बातम्या