चीनीमाल नकोच

साकीनाका – चीनीमालावर बहिष्कार टाकावा यासाठी जागोजागी जनजागृती केली जातेय. अश्याचप्रकराची जनजागृती साकीनाका जंक्शनवर केली गेली. भारतीय जनता पार्टी प्रवाशी ओडिया संघ आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उत्तर मध्य मुंबई यांच्या वतीने चिनी मालावर बहिष्कार घालावा यासाठी आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी पाकिस्तान आणि चीन यांच्या विरोधात घोषणा बाजी केली आणि चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी करणारे पत्रकं वाटली.

पुढील बातमी
इतर बातम्या