विक्रोळी - मुंबईला माफीया मुक्त करतानाच महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आणणार असल्याचे वक्तव्य खासदार किरीट सोमय्या यांनी केले आहे. कन्नमवार नगरमधील विकास कॉलेजच्या हॉलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त भाजपा कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कांजूर येथील डम्पिंग हटविण्याचा निर्धार भाजपा सरकारने केला आहे. असे सांगतानाच या वेळी मुंबई महापालिकेत भाजपाचीच सत्ता येणार असल्याचा दावा खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या मंगेश सांगळे यांच्या मनसेतील 80 समर्थकांनी आणि काँग्रेसच्या 20 कार्यकर्त्यांनी भाजपात या वेळी प्रवेश केला.