मलबार हिल - येत्या 8 मार्चला होणाऱ्या मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीवरुन सुरु असलेला वाद अखेर मिटला आहे. भाजपा महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार देणार नसल्याने पालिकेत आता शिवसेनेचा महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. कोणत्याही प्रकारची तडजोड करून आम्हाला महापौर पदाच्या शर्यतीत उतारायचं नाही. मुंबईच्या हितासाठी हा निर्णय घेतला असून, गरज पडल्यास शिवसेनेला मदत करू, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 84 जागा तर भाजपाला 82 जागा मिळाल्या आहेत. कोणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने हा निर्णय घेतल्याचं फडणवीस म्हणाले.