के पूर्व विभागात उलथापालथ

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

जोगेश्वरी - प्रभाग पुर्नरचना आणि आरक्षणामुळे के पूर्व विभागातील प्रभागांमध्ये उलथापालथ झाली आहे. त्यामुळे काही नगरसेवकांना नव्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे.

के/पूर्व हा विभाग महानगरपालिका चुनावांसाठी अत्यंत महत्वाचा व मोठा विभाग मानला जातो ह्या विभागात प्रभाग क्रमांक 72 ते प्रभाग क्रमांक 86 असे 15 प्रभाग आहेत. नव्या आरक्षणामध्ये प्रभाग क्रमांक 72 आणि 73 हे खुल्या विभागातील पुरुषांसाठी आहेत. तर प्रभाग क्रमांक 74 हा आता प्रभाग क्र. 75 ला जोडला गेला असून, तो खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत उमेश राणे(भाजप)यांच्या पत्नी समिधा राणे(भाजप) येथून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

प्रभाग क्रमांक 76 हा पुरुष ओबीसीसाठी राखीव झाल्याने येथील काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका केसरबेन मुरजी पटेल यांना पत्ता कट झाला आहे. येथून भाजपाचे उमेदवार अविनाश भागवत निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे.

प्रभाग क्रमांक 80 हा जोगेश्वरीतील प्रभागाला जोडला गेला आहे. हा प्रभाग खुला झाला आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेविका शिवानी परब(शिवसेना) यांचे पती शैलेश परब हे येथून निवडणूक लढवतील. भाजपाचे अजय तिवारी व शंकर तावडे हेही या प्रभागातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

प्रभाग क्रमांक 72 आता प्रभाग क्र. 81 करण्यात आला आहे. हा प्रभाग पुरुष आेबीसीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 75 आता प्रभाग क्र. 86 करण्यात आला असून, तो खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी करण्यात आला आहे. येथून सुषमा रॉय (काँग्रेस) व (भाजप) चे उमेदवार सरबजित सिंधू यांच्या पत्नी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या