मंगळवारी घोषित झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या आरक्षण यादीमुळे शिवसेना (शिंदे गट)ला अधिक फायदा झाल्याची चर्चा सुरू आहे.
सध्या शिवसेनेकडे 128 विद्यमान आणि माजी नगरसेवकांची मजबूत फळी आहे, ज्यामध्ये 62 महिला नगरसेविका आहेत.
महिला आरक्षणामुळे भाजपच्या अनेक नगरसेवकांना आपले वॉर्ड गमवावे लागले किंवा वॉर्ड बदलावे लागले, तर महिलांचा मजबूत सहभाग असलेल्या शिवसेनेला याचा मोठा फायदा झाला आहे.
‘लाडकी बहीण’ मॉडेलचा फायदा
शिवसेना महिला आघाडीचे मुंबईतील मजबूत जाळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबवलेले ‘लाडकी बहीण’ मॉडेल या दोन्ही गोष्टींचा एकत्र परिणाम शिवसेनेला मुंबई महापालिकेत सत्तेच्या अगदी जवळ नेऊ शकतो.
मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांपैकी 114 प्रभाग महिलांसाठी राखीव करण्यात आले आहेत.
आजच्या आरक्षण लॉटरीनंतर शिवसेनेच्या बहुतेक महिला नगरसेविकांनी आपले प्रभाग टिकवून ठेवले आहेत. तर उद्धव ठाकरे गट आणि भाजपच्या अनेक वरिष्ठ नगरसेवकांचे वॉर्ड महिला आरक्षणात गेले आहेत. त्यामुळे ही लॉटरी शिवसेनेच्या फायद्याची ठरली आहे, असे जाणकारांचे मत आहे.
अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव प्रभागांतील शिवसेना नगरसेविका
अनुसूचित जमातीसाठी राखीव प्रभाग क्रमांक 53 आणि 121 हे दोन्ही सध्या शिवसेनेच्या नगरसेविकांकडे आहेत —
प्रभाग ५३ – रेखा रामवंशी
प्रभाग १२१ – चंद्रावती मोरे
तसेच, विद्यमान नगरसेविका समृद्धी काते (प्रभाग 146) यांचा प्रभाग आता अनुसूचित जातींसाठी राखीव झाला आहे. तर अंजली नाईक (प्रभाग 147) यांचा प्रभाग अनुसूचित जातींच्या महिलांसाठी राखीव करण्यात आला आहे.
ओबीसी महिलांसाठी राखीव प्रभागांत शिवसेनेच्या 5 विद्यमान महिला नगरसेविका आहेत.
प्रभाग 11 – रिद्धी खुरसुंगे
प्रभाग 12 – गीता सिंघल
प्रभाग 18 – संध्या दोशी
प्रभाग 117 – सुवर्णा कारंजे
प्रभाग 128 – अश्विनी हांडे
तसेच,
प्रभाग 142 – वैशाली शेवाळे
प्रभाग 61 – राजूल पाटेल
प्रभाग 143 – ऋजुता तारी
हे प्रभाग देखील महिलांसाठी राखीव झाले आहेत.
या सर्वांमुळे योग्य उमेदवार शोधण्यात शिवसेनेला फारशी अडचण येणार नाही, असे मानले जात आहे.
महिला प्रतिनिधींची मोठी फळी
गेल्या तीन वर्षांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मुंबईसह राज्यभरातील हजारो महिला नगरसेवक आणि पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
मुंबईतील 62 विद्यमान व माजी महिला नगरसेविकांनी धनुष्यबाण चिन्ह स्वीकारले आहे.
शिवसेनेचे महिला मोर्चाचे जाळे संघटनेत अत्यंत सक्रिय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत उमेदवारीसाठी अनेक महिला इच्छुक आहेत.
मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी राबवलेली ‘लाडकी बहीण योजना’ राज्यातील सुमारे अनेक महिलांपर्यंत पोहोचली, त्यामुळे महिलांमध्ये त्यांच्या प्रति विशेष आदर आहे.
स्थानिक निवडणुकांमध्ये उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व, प्रतिमा आणि लोकांशी थेट संपर्क महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे आगामी निवडणुकांत महिला उमेदवार आणि महिला मतदार निर्णायक भूमिका बजावतील, अशी शक्यता आहे.
उद्धव ठाकरे गटाला आरक्षणाचा मोठा फटका
महिला आरक्षणामुळे सर्वात मोठा फटका उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांना बसल्याचे चित्र आहे.
उबाठा गटाचे विद्यमान नगरसेवक अनिल पाटणकर (प्रभाग 153) यांचा वॉर्ड ओबीसी महिलांसाठी राखीव झाला आहे.
तसेच, अनुसूचित जातींच्या महिलांसाठी राखीव झालेल्या दोन प्रभागांमध्येही उबाठा गटाचे नगरसेवक होते
प्रभाग 183 – वसंत नकाशे
प्रभाग 155 – श्रीकांत शेट्ये
सामान्य प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झालेल्या प्रभागांमुळे उबाठा गटाचे आणखी 7 विद्यमान नगरसेवक बाधित झाले आहेत
रमेश कोरगावकर (114), दत्ता पोंगडे (205), मोहम्मद खान (96), सदानंद परब (88), अनंत नर (77), सुरेश पाटील (127) आणि आशिष चेंबूरकर (196).
भाजपच्या 14 नगरसेवकांचे वॉर्ड महिलांसाठी राखीव
प्रभाग १०३ – मनोज कोटक
प्रभाग १५१ – राजेश फुलवारिया
प्रभाग १३२ – पराग शाह
प्रभाग २ – जगदीश ओझा
प्रभाग ८ – हरेश छेडा
प्रभाग १७४ – कृष्णवल्ली रेड्डी
प्रभाग ८४ – अभिजीत सामंत
प्रभाग ७१ – अनिश मकवानी
प्रभाग १५ – प्रवीण शाह
प्रभाग ३१ – कमलेश यादव
प्रभाग २२० – अतुल शाह
प्रभाग ७२ – पंकज यादव
प्रभाग ६० – योगराज दाभोळकर
प्रभाग २२७ – मकरंद नार्वेकर
काँग्रेस आणि समाजवादी पक्षालाही फटका
आरक्षणामुळे काँग्रेसचे 3 आणि समाजवादी पक्षाचे 1 नगरसेवकांचे वॉर्ड महिलांसाठी राखीव झाले आहेत
प्रभाग १६५ – अशरफ आझमी (काँग्रेस)
प्रभाग १८४ – बब्बू खान (काँग्रेस)
प्रभाग २१३ – जावेद जुनेजा (काँग्रेस)
प्रभाग १३९ – अब्दुल कुरेशी (समाजवादी पक्ष)
हेही वाचा