BMC Election साठी प्रभाग रचना जाहीर

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 आधी पूर्ण कराव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यानुसार तयारी देखील सुरू झाली आहे. 

यामध्ये मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आहे. त्याबाबतचा सविस्तर तपशील पालिकेनं जारी केला आहे. एका संकेतस्थळाच्या माध्यमातून याबाबतची माहिती नकाशासह देण्यात आली आहे. 

प्रभाग रचना जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या धर्तीवर प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाने मंजूरी दिली आहे.

अंतिम करण्यात आलेली प्रभाग रचना शासन राजपत्रामध्ये आणि महानगरपालिका संकेतस्थळावरील https://mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlBMCElectio2025 या लिंकवर दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली.

राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित आहेत. मुंबई महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारुप आराखडा 22 ऑगस्ट रोजी जाहीर केला होता. ज्यानंतर आता अंतिम प्रभाग आराखडा समोर आला आहे.

कुठे पाहता येईल प्रभाग रचनेचा आराखडा? 

https://mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlBMCElectio2025 या संकेतस्थळावर गेलं असता पालिकेकडून प्रभाग रचनेचा आराखडा समोर आणला आहे. जिथं, मुंबईतील 227 प्रभागांच्या रचनेला मंजुरी मिळाल्याचं लक्षात येत आहे. 

बऱ्याच काळापासून राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काळात अपेक्षित आहे.

मुंबई महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारुप आराखडा ऑगस्ट महिन्यात जारी केला होता. या  आराखड्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी नागरिकांना 4 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली.

ज्यानंतर 494  हरकती  आणि सुचनांना अनुसरून पार पडलेल्या तीन दिवसी. सुनावणीनंतर मुंबईतील 227 प्रभाग कायम ठेवत 2017 मधील प्रभागांमध्ये फारसे बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळालं नाही.


हेही वाचा

निवडणूक आयोगाचे मोठे पाऊल, आता...

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदार यादीचे वेळापत्रक जाहीर

पुढील बातमी
इतर बातम्या