राज्य मंत्रिमंडळ खातेवाटप, राष्ट्रवादीची खाती भाजपाकडे, तर शिंदे गटाला काय?

मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. 

त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे  सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. 

*इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:*

*सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील -*

महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

*सुधीर मुनगंटीवार-*

वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

*चंद्रकांत पाटील-*

उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

*डॉ. विजयकुमार गावित-*

आदिवासी विकास

*गिरीष महाजन-*

ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 

*गुलाबराव पाटील-*

पाणीपुरवठा व स्वच्छता 

 *दादा भुसे-*

बंदरे व खनिकर्म 

*संजय राठोड-*

अन्न व औषध प्रशासन

*सुरेश खाडे-*

कामगार

 *संदीपान भुमरे-*

रोजगार हमी योजना व फलोत्पादन

 *उदय सामंत-*

उद्योग

 *प्रा.तानाजी सावंत-*

सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण

*रवींद्र  चव्हाण -*

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण

*अब्दुल सत्तार-*

कृषी

*दीपक केसरकर-*

शालेय शिक्षण व  मराठी भाषा

*अतुल सावे-*

सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

*शंभूराज देसाई-*

राज्य उत्पादन शुल्क

*मंगलप्रभात लोढा-*

पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास

पुढील बातमी
इतर बातम्या