‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना फक्त जाहिरातीपुरती'

मुंबई - सरकारी'बेटी बचाओ,बेटी पढाओ' ही योजना फक्त जाहिरातीपुरती असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केलीय. घाटकोपर पूर्वमधील द युनिव्हर्सल स्कूलमधील शिक्षकाने विद्यार्थिनीचा अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी त्यांनी रविवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेत, शिक्षकास बडतर्फ करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. तसंच शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करून शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी केली. सरकारकडून 'बेटी बचाओ,बेटी पढाओ या योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. तरीही यवतमाळ पब्लिक स्कूल, बुलडाणा अत्याचारा, घाटकोपरमधील शाळेत शिक्षकाकाडून मुलीच्या विनयभंग अशा घटना घडत आहेत. हे सगळं पाहता राज्यातील मुली-विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण होत असल्याच सांगून चित्रा वाघ यांनी सरकारवर टीका केली.

पुढील बातमी
इतर बातम्या