राजकीय पक्षांची कंदिलबाजी

दादर - दिवाळी आली की वेध लागतात ते कंदिलांचे. यंदाही नानाविध प्रकारचे कंदील बाजारात दाखल झालेत. या वेळी कंदिलांमध्ये निवडणुकीचा ज्वर अधिक दिसून येतोय. मनसे, शिवसेना, काँगेस आणि भाजप यांच्या झेंड्यांच्या रंगाचे पारंपरिक कंदील खास तयार करण्यात आलेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच दादर, माहिम, माटुंगा विभागात कंदील वॉर पाहायला मिळतंय. यासाठी राजकीय पक्ष आणि मंडळे राजकीय रंगाचे, चिन्हांचे आकाशकंदील कारागिरांकडून बनवून घेतात. बाराशे ते पंचवीस हजार रुपयापर्यंत हे कंदील विकले जातात. राजकीय पक्षांसोबत कंदील बनवणाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. पक्षांचे बॅनर महापालिकेकडून कारवाई करत ते उतरवले जातात. पण कंदील लावल्यावर कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे राजकीय पक्ष कंदिलाच प्राधान्य देतात. पण निवडणुकांपूर्वीच राजकीय पक्षांमध्ये कंदीलबाजी चांगलीच रंगणार हे मात्र नक्की.

पुढील बातमी
इतर बातम्या