'मुख्यमंत्र्यांनी ब्रोकरची भूमिका बजावली'

सीएसटी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी शनिवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सेटलमेंटचा फॉर्म्युला अवलंबला असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला आहे. मुंबई शहर काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'राज ठाकरे कायद्याला आव्हान देत निर्मात्याला धमकावतात', 'त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेट पाठिंबा दिला' 'याची आम्ही निंदा करतो' असं निरूपम यांनी म्हटलं. 'उरी हल्ल्यानंतर प्रत्येकवेळी भारतीय सैन्याला ढाल करणे ही निंदनीय बाब आहे', 'मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे' अशी निरुपम यांनी मागणी केली आहे. 'मुख्यमंत्री आणि सरकार लाचार झाले आहेत'. मुख्यमंत्री फडणवीस, राज ठाकरे आणि करण जोहर यांच्यात झालेल्या बैठकीत सैनिक कल्याण निधीत पाच कोटी रुपये जमा करण्यासाठी निर्मात्याला धमकावण्यात आल्याचा आरोप निरुपम यांनी केलाय. 'भाजपने मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवाव, आणि मीटिंगमधील सर्व बाबी जनतेसमोर उघड कराव्यात' असं म्हणत निरूपम यांनी लवकरच मुंबई काँग्रेस याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या