नव्या तटरक्षक दल प्रमुखांची राज्यपालांशी भेट

मुंबई - भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी प्रदेशाचे नवनियुक्त प्रमुख, अतिरिक्त महासंचालक के. नटराजन यांनी शुक्रवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली. या वेळी नटराजन यांनी राज्यपालांना पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांच्या सुरक्षेविषयी तटरक्षक दलातर्फे केल्या जात असलेल्या उपाययोजनांबद्दल तसंच मच्छिमार बांधवाच्या सुरक्षेबाबत माहिती दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या