विनय कटियार यांच्या पुतळ्याचं दहन

दादर - प्रियांका गांधींबद्दल वादग्रस्त विधान करणं हे उत्तर प्रदेशातील भाजपा नेते विनय कटियार यांना चांगलंच भोवलंय. या वक्तव्याविरोधात काँग्रेस महिला आघाडीनं गुरुवारी मुंबईतील दादर इथल्या टिळक भवनात आंदोलन केलं. या वेळी कटियार यांचा पुतळा जाळत आंदोलकांनी भाजपा आणि कटियार यांच्याविरोधी घोषणा दिल्या. राज्य महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आलं. अशी विधानं म्हणजे भाजपच्या नेत्यांची मानसिकता दाखवतं तसेच या विधानाबद्दल कटियार यांनी माफी मागावी अशी मागणी टोकस यांनी केली.

पुढील बातमी
इतर बातम्या