महापौरपदी कोण होणार विराजमान?

मुंबई - मुंबई महापालिकेवरील सत्तेसाठी शिवसेना आणि भाजपाने दोघांनीही दावा केला आहे. परंतु महापौरपदाचे दावेदार असलेले शिवसेनेचे यशोधर फणसे आणि तृष्णा विश्वासराव यांचाच पराभव झाल्याने किशोरी पेडणेकर, माजी नगरसेविका राजूल पटेल, शुभदा गुडेकर, मंगेश सातमकर यांची नावे पुढे येत आहेत. तर भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार असलेल्या मनोज कोटक हे विजयी झाल्यामुळे त्यांच्या नावाचीही चर्चा जोरात सुरु आहे.

मुंबईचे महापौरपद हे यावेळी खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर कुणालाच स्पष्ट बहुमत नसले तरी महापौरपदाच्या उमेदवाराची चर्चा चांगली सुरु आहे. मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच असेल असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. परंतु शिवसेनेच्या महापालिकेतील दोन प्रमुख नेत्यांना पराभव पत्करावा लागला आहे. यशोधर फणसे आणि तृष्णा विश्वासराव यांचा पराभव हा शिवसेनेचा मोठा पराभव मानला जात आहे. भाजपाची सत्ता आल्यास मनोज कोटक हे त्यांचे महापौरपदाचे प्रमुख उमेदवार असून, त्यानंतर उपमहापौर अलका केरकर, शैलजा गिरकर, यांची नावे चर्चेत आहेत. माजी आमदार अतुल शहा यांना नगरसेवकपदाची लॉटरी लागल्यामुळे त्यांचे नावही भाजपाच्या महापालिका गटनेतेपदी घेतले जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या