आमदारांचा मनपा अधिकाऱ्यांसह दौरा

दहिसर पूर्व - दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत आपल्या परिसरात दौरा केला. हा दौरा परिसरातील समस्या सोडवण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रकाश सुर्वे आणि नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांनी वॉर्ड नंबर10 च्या समस्या पालिका अधिकाऱ्यांना सांगितल्या, आणि त्या लवकरच सोडवू असं आश्वासनही पालिका अधिकाऱ्यांनी या वेळी दिलं. दहिसरमधील हनुमान टेकडीपासून बोरीवली नॅशनल पार्कच्या नदीपर्यंत रस्ते, गटारांची पाहणी या वेळी करण्यात आली.

पुढील बातमी
इतर बातम्या