खेळ वाचवा, मैदान वाचवा

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

अंधेरी पूर्व - मालपा डोंगरी क्र.3 मधील मैदानातच लादीकरणाचे काम केले जात आहे. एकीकडे शहरात मुलांना खेळायला जागा शिल्लक नसताना चक्क मैदानातच लाद्या बसवल्या जात असल्यानं यावर टिकेची झोड उठवली जातेय. या मुद्द्यावरून आता फेसबुक वॉर सुरू झालाय. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मैदानात नगरसेविका सुनिता इलावडेकर यांनी काही स्थानिक नागरिकांच्या मागणीवरून नगरसेवक निधीतुन लादीकरण कामाचा बुधवारी शुभारंभ केला. मात्र याचं मैदानात गेले अनेक वर्ष कबड्डी खेळली जात होती.

संभाव्य भाजप उमेद्वार अविनाश भागवत यांनी कबड्डी खेळ वाचवा, मैदान वाचवा अशी पोस्ट फेसबुकवर टाकली. जर येथे लादी बसवण्यात आल्या तर कबड्डी कुठे खेळणार? यावरून फेसबुकवर वाद सुरु आहेत. लवकरच या प्रकरणी सभा घेऊन हे वाद मिटवले जातील आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे अविनाश भागवत यांनी सांगितले. तर स्थानिकांनी आपल्याला लादी बसवायला सांगितलं असल्याचं पत्र दिलं, मी कुठलंही चुकीचं काम केलं नसल्याचं सुनिता इलावडेकर यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या