तबेला कामगारांचे धरणे आंदोलन

सीएसटी – गोरेगाव पूर्वेकडील आरे मिल्क कॉलनी येथील 350 तबेल्यांमध्ये असलेल्या 3 हजार तबेला कामगार न्याय हक्कापासून वंचित आहेत. या कामगारांना न्याय हक्क मिळावा यासाठी धडक कामगार युनियनने सोमवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले.

तबेला कामगारांना 15 हजार मासिक पगार मिळावा, त्यांना प्रॉव्हिडेंट फंड आणि आरोग्य विमा लागू करावा. कामगारांना दरवर्षी पगारवाढ आणि बोनस मिळावा, साप्ताहिक सुट्टी मिळाली पाहिजे, तीन दिवसांची भरपगारी सुट्टी, वेतन भत्ता, ओव्हरटाईम मिळावा, तबेला कामगारांना 1 लीटर दूध, कामगारांना निवासस्थान मिळाले पाहिजे आदी मागण्या कामगारांच्या आहेत. या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांना देण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या