निवडणूक आयोगाचे मोठे पाऊल, आता...

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी गेल्या सहा महिन्यांत भारतीय निवडणूक आयोगाने विविध उपक्रम राबविले आहेत. पुढील पाऊल म्हणून, आयोगाने पोस्टल मतपत्रिका मोजणी प्रक्रिया सोपी आणि सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोस्टल मतपत्रिका मोजणीपासून स्वतंत्रपणे ईव्हीएम मतांची मोजणी सुरू होऊ शकते.

कागदी/इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पोस्टल मतपत्रिकांची मोजणी आणि ईव्हीएमद्वारे मोजणी हे आयोगाच्या मतमोजणी प्रक्रियेचे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत. मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8 वाजता पोस्टल मतपत्रिका मोजणी सुरू होते. तर ईव्हीएम मोजणी सकाळी 8:30 वाजता सुरू होते.

मागील सूचनांनुसार, पोस्टल मतपत्रिका मोजणीपासून स्वतंत्रपणे ईव्हीएम मोजणी सुरू राहू शकते, ज्यामुळे कधीकधी पोस्टल मतपत्रिका मोजणीपूर्वी ईव्हीएम मोजणी पूर्ण होत असे.

पोस्टल मतपत्रिका मोजणी पूर्ण झाल्यानंतरच ईव्हीएम/व्हीव्हीपीएटी मोजणीचा अंतिम टप्पा सुरू करण्याचा निर्णय

अलीकडे, अपंग मतदार आणि 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरपोच मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे पोस्टल मतपत्रिकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यामुळे, संपूर्ण प्रक्रियेत एकसमानता आणि स्पष्टता राखण्यासाठी, आयोगाने पोस्टल मतपत्रिका मोजणी पूर्ण झाल्यानंतरच ईव्हीएम/व्हीव्हीपॅट मतमोजणीचा अंतिम टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुरेशा संख्येत टेबल आणि मतमोजणी कर्मचारी उपलब्ध करून देण्याच्या सूचना

शिवाय, मतमोजणी प्रक्रियेत गती आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्याचा हेतू आहे. यासाठी जास्त संख्येत पोस्टल मतपत्रिका असलेल्या मतदारसंघांमध्ये पुरेशा संख्येत टेबल आणि मतमोजणी कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश आयोगाने संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.


हेही वाचा

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदार यादीचे वेळापत्रक जाहीर

पुढील बातमी
इतर बातम्या