ओशिवरा ऐवजी राम मंदिर नामकरण करा - वीरसेना

मुंबई - पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव आणि जोगेश्वरी स्थानकाच्या मध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या ओशिवारा स्थानकाचं नामकरण राम मंदिर असं करावं अशी मागणी वीरसेनेनं केलीय.

येत्या 27 नोव्हेंबरला या नवीन रेल्वे स्थानकाचं उद् घाटन केलं जाणार आहे. ज्या परिसरात नवीन स्थानक बांधलंय, त्या परिसरात 250 वर्ष जुने राम मंदिर आहे. तसंच इथल्या रहिवाशांच्या वीजबिल, आधारकार्ड, वोटिंगकार्डवरील पत्त्यात देखील राम मंदिर असं लिहलेलं असतं. त्यामुळे नव्यानं बांधण्यात आलेल्या या स्थानकाला राम मंदिर नाव द्यावं अशी मागणी इथल्या रहिवाशांनी केलीय.

जर स्थानिकांच्या भावनांचा विचार न करता रेल्वे प्रशासनाने ओशिवरा स्थानक नाव दिल्यास तीव्र विरोध करण्यात येईल असा इशारा वीर सेनेचे अध्यक्ष निरंजन पाल यांनी दिलाय. गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढील बातमी
इतर बातम्या