धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धरणं

आझाद मैदान - अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचच्या वतीनं मंगळवारी आझाद मैदानात धरणं आंदोलन करण्यात आलं. धनगर समाज 1956 पासून अनुसूचित जमातीत असतानाही ध चा मा केल्याप्रमाणे, धनगर ऐवजी धनगड असं लिहून घोळ घातला आहे. 60 ते 65 वर्षांपासून धनगर जमात आरक्षणापासून वंंचित राहिली आहे. त्यामुळं न्याय हक्क मिळवण्यासाठी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच या संस्थेच्या वतीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

धनगर जमात अनुसुचित जमातींत असणं अनिवार्य आहे. तसे पुरावे असतानाही संबंधित खातं आणि महाराष्ट्र तसंच केंद्र सरकारनं धनगडची दुरुस्ती अद्याप धनगर अशी केलेली नाही. त्याविरोधात हे आंदोलन करण्यात आलं.

पुढील बातमी
इतर बातम्या