मुंबई - मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात गर्दी वाढतेय. फक्त सामान्यच नाही तर दृष्टीहीनही मतदान करण्यासाठी घराबाहेर पडलेत. शिवाजी पार्कचे रहिवासी असलेले विजय कुमार पांडुरंग संझगिरी यांनीही मतदान केले. ते 82 वर्षांचे आहेत. त्यांना फक्त 5 टक्केच दृष्टी आहे. 18 वर्षांचे असल्यापासून ते आपल्या बहिणीसोबत मतदानाला येतात. त्यांची बहीण जोत्स्ना पांडुरंग संझगिरी या 72 वर्षांच्या आहेत. प्रभाग 191 मधल्या दादरच्या शिवाजी पार्क जवळील बालमोहन विद्यामंदिर या शाळेत त्यांनी मतदान केलं.
तर मोतीलालनगर आणि घाटकोपर इथल्या पोलिंग बुथवर दिव्यांगांनीही मतदान केले. मतदानाच्या बाबतीत यांचा असलेला उत्साह हा खरच नवख्या मतदारांसाठी एक प्रेरणादायी आहे.