दलित अत्याचार अहवालाचे प्रकाशन

दादर - नाशिक येथे झालेल्या हिंसक घटनांचा अभ्यास करुन तयार केलेल्या एका अहवालाचे प्रकाशन शनिवारी दादरच्या आंबेडकर भवनात करण्यात आले. या अहवालात नाशिकमधील दलितांवर झालेल्या अत्याचाराची संपूर्ण माहिती दिली गेली. अहवाल खरा आहे का हे दाखवण्यासाठी काही चित्रफिती देखील दाखवण्यात आल्या. यामध्ये गोंदियामधील वाडिवरे येथील बुद्ध मूर्तींची तोडफोड या एकाच गावात वेगवेगळ्या 4 वेळेला दलितांवर हल्ला करण्यात आला, त्याचे व्हिडिओ या वेळी दाखवण्यात आले. या घटनांचा विषेश अभ्यास सागर भालेराव , सुधीर ढवले , हर्षाली पोद्दार या सामाजिक कार्यकर्त्यांच्या गटाने केला आहे. यामध्ये टाटा इंस्टिट्यूट आणि अनेक वेगवेगळे कॉलेजचे विद्यार्थी दलित चळवळीतील कार्यकर्ते सहभागी आहेत. या वेळी अनेक कार्यकर्ते विद्यार्थी आणि सामान्य नागरिक सहभागी झाले होते.

पुढील बातमी
इतर बातम्या