'ज्ञानाचे प्रतिक' पुस्तक प्रकाशित

दादर - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आजन्म आदर्श विद्यार्थी होते. त्यांच्या विचारांची धुरा पुस्तकाच्या माध्यमातून आजच्या विद्यार्थ्यांनाही अवगत व्हावी या हेतूने लेखिका प्रतीक्षा कांबळे यांनी लिहिलेल्या 'ज्ञानाचे प्रतिक' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दादर पश्चिम चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती इथे 5 डिसेंबरला भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते पार पडला. या वेळी बबन कांबळे, बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापक प्रकाश पगारे, उत्तम सदाफुले आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर पुस्तकाची किंमत 300 रुपये इतकी असून 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त हे पुस्तक 250 रुपयाला विक्रीसाठी ठेवण्यात आलेय.

पुढील बातमी
इतर बातम्या