मालाडमध्ये कही खुशी कही गम

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

मालाड - सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक निवडल्यानंतर मालाडमध्येही अनपेक्षित निकाल लागला आहे. मालवणीत काँग्रेसला आपलं वर्चस्व अबाधित राखण्यात यश आलंय. मालाडमध्ये काँग्रेसला 4 जागांवर विजय मिळवण्यात यश आले असून भाजपाला 3 जागेंवर तर शिवसेनेला एक जागा मिळवण्यात यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या उमेदवारांना हजार मतं देखील मिळाली नाहीत.

प्रभाग क्रमांक 32 मधून काँग्रेसच्या स्टेफी केणी, 33 मधून काँग्रेसचे उमेदवार विरेंद्र चौधरी, 34 मधून काँग्रेसचे कमरजहॉं सिद्धिकी, 35 मधून भाजपाच्या सेजल देसाई, 46 मध्ये भाजपाच्या योगीता कोळी, 47 मधून भाजपाच्या उमेदवार जया तिवाना, 48 मध्ये काँग्रेसच्या सलमा अलमेलकर, 49 मधून शिवसेनेच्या संगीता संजय सुतार या उमेदवारांचा विजय झाला आहे.

काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी मालवणीतील निकालावर समाधान व्यक्त केले आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या निकालानंतर मतमोजणी कार्यालयाबाहेर फटाके फोडून विजय साजरा केला.

पुढील बातमी
इतर बातम्या