महापालिका निवडणुकीवर आयकर विभागाची नजर

सीएसटी - महापालिका आणि जिल्हा परिषदाच्या निवडणुका तोंडावर आहेत. याच पार्श्वभूमीवर शनिवारी निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. संवदेनशील क्षेत्रातील मतदान केंद्रांची अंतिम यादी बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. निवडणूक आयोगाने तीन दिवस ड्राय डे जाहीर केला आहे. निवडणुकी दरम्यान नागरिकांमध्ये शासनाप्रती विश्वास निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. अप्पर मुख्य सचिव यांची मुख्य निवडणूक निरीक्षक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.या वेळी प्रथमच ऑनलाइन उमेदवारी अर्ज आणि प्रतिज्ञापत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. त्यानंतर प्रिंटआऊट काढून अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहे. त्यासाठी मदत केंद्र उभारण्यात येणार आहे. याद्वारे प्रत्येक उमेदवाराची माहिती मतदारांना मिळणार आहे. उमेदवाराचे शपथपत्राचे घोषवाक्य वर्तमानपत्राद्वारे जाहिरात स्वरुपात देण्यात येणार आहे. पोलीस स्टेशन समोर उमेदवारांच्या शपथपत्राचा गोषवारा लावण्यात येईल, असंही सहारिया यांनी स्पष्ट केले.

पुढील बातमी
इतर बातम्या