शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचे छापे

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीनं शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर मंगळवारी सकाळी छापे मारले आहेत. त्यांचे पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे अधिकारी दाखल झाले. मुंबई, ठाणे परिसरातील एकूण १० ठिकाणी शोध सुरु आहे. 

दिल्लीच्या टीमच्या नेतृत्त्वात ही कारवाई सुरु आहे. सरनाईक यांच्याव्यतिरिक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे. प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे आमदार असून, ठाण्यातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. 

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रनौत प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही कारवाई होत असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या