अाता एलिफंटाही दिव्यांनी उजळणार!

भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास तब्बल ७० वर्ष लोटली. पण एलिफंटा या बेटावर वीज मात्र पोहोचू शकली नव्हती. अाता येत्या अाठवडाभरात एलिफंटावर वीजजोडणी करण्यात येणार अाहे. उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून संबंधित बाबी पूर्ण केल्या जाणार अाहे, अशी माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

एलिफंटा बेटावर ९ वर्षांनंतर होणार एलिफंटा महोत्सव

२७ ते २९ जानेवारीदरम्यान एलिफंटा महोत्सवाचं अायोजन करण्यात अालं अाहे. सध्या वीजजोडण्या देण्याची चाचणी सुरू असून ती लवकरच पूर्ण होणार अाहे. वीजजोडणी झाल्यानंतर ९ वर्षांनंतर प्रथमच हा महोत्सव रंगणार अाहे. राज्यभरातील पर्यटकांना आकर्षित करणे, कला प्रकारांच्या माध्यमातून संस्कृतीचं संवर्धन करणे आणि पर्यटकांना एक अविस्मरणीय अनुभव देणे, हे या महोत्सवाचं मुख्य उद्दिष्ट आहे.

पर्यटकांना रात्रीपर्यंत थांबण्याची संधी    

सुरक्षेच्या कारणास्तव एलिफंटा या ठिकाणी पर्यटकांना जास्त वेळ थांबता येत नव्हतं. मात्र, आता पर्यटकांना या महोत्सवाच्या माध्यमातून रात्री १०.३० पर्यंत थांबण्याची संधी मिळणार अाहे. यासाठी सरकारनं योग्य त्या परवानग्या घेतल्या असून पर्यटकांच्या सुरक्षेची योग्य ती काळजीदेखील घेण्यात येणार अाहे.

‘मिशन एलिफंटा 2018’

एलिफंटा येथील स्थानिकांना एकत्र घेऊन महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि एअारबीएन कंपनीसोबत हातमिळवणी करून पर्यटनाला चालना देण्यासाठी याठिकाणी प्रकल्प राबविण्यात येणार अाहे. या ठिकाणी विकासाची कामं राबविण्यात येणार असून केबल कार प्रकल्प सुरू करण्याचा सरकारचा विचार अाहे. एलिफंटाला ब्रँडिंग रिब्रँडिंग करणार असल्याचंही रावल यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या