अतिक्रमणाच्या विळख्यात रे रोड स्थानक

रे रो़ड - मुंबईतल्या जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या रे रोड स्थानकाबाहेरील परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या स्थानकाच्या बाहेरील फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या झोपड्या नुसत्या फुटपाथपुरत्या सीमित न राहता थेट रे रोड रेल्वे स्थानकाच्या मुख्य दरवाज्याला चिकटून बांधण्यात आल्या आहेत. फुटपाथवरील अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान अनेकवेळा अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली होती मात्र गेल्या आठवड्याभरात कारवाई थंडावल्यामुळे पुन्हा जागोजागी टपऱ्या उभारल्या गेल्याची माहिती इ वॉर्डचे सहाय्यक अभियंते सतीश मालेकर यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या