अनिल दवे यांचे योगदान महाराष्ट्र कायमच स्मरणात ठेवेल - मुख्यमंत्री

केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही अनिल दवे यांना मृत्यूने कवटाळले. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांच्या मृत्यूनंतर मुंबईसहित सर्व ठिकाणी राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले.

अनिल दवे यांच्या निधनाने आपल्याला मोठा धक्का बसला आहे, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या निमित्ताने आपण त्यांच्या सातत्याने संपर्कात होतो. अनिल दवेंनी या प्रकल्पांना चालना आणि देण्याबाबत जातीने लक्ष घालून तातडीने कार्यवाही केली होती. प्रस्तावित सागरी किनारा मार्ग आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रांना अनिल दवे यांनी तात्काळ पर्यावरणविषयक मंजुरी दिल्या होत्या. दवे यांचे योगदान महाराष्ट्र कायमच स्मरणात ठेवेल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढील बातमी
इतर बातम्या