एक्झिट पोलमध्ये शिवसेनाच पुढे

मुंबई - मुंबई महापालिकेचे मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोल बाहेर येवू लागले असून, या पोलमध्ये शिवसेना अव्वल क्रमांकावर आहे. मात्र, या पोलमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दशर्वले नसून, शिवसेनेनेनंतर भाजपाचे नगरसेवक दुसऱ्या क्रमांकावर निवडून येतील, असा अंदाज वर्तवला आहे.

अॅक्सिस-इंडिया टुडे यांच्या एक्झिट पोलने आपला अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार महापालिकेतील सत्तेसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये काटे की टक्कर असल्याचे दिसून येत आहे. अॅक्सिस-इंडिया टुडेच्या पोलनुसार मुंबईत शिवसेना (८६ ते ९२), भाजपा (८० ते ८८), काँग्रेस (३० ते ३४), मनसे (५ ते७), राष्ट्रवादी काँग्रेस (३ ते ६) एवढे नगरसेवक निवडून येतील,असा अंदाज वर्तवला आहे. तिथेच नेटझॅच रिसर्च अँड डेव्हलपमेंटने केलेल्या सर्वेमध्ये त्यांनी शिवसेना (९१), भाजपा (८४), काँग्रेस (३३),राष्ट्रवादी काँग्रेस (०४), मनसे (०५), समाजवादी पक्ष (०२), एआयएमआयएम (०३), इतर (०५) एवढे नगरसेवक निवडून येतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

अॅक्सिस-इंडिया टुडे यांच्या एक्झिट पोलने बिहारच्या निवडणुकीत भाजपाला १२७ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. पण प्रत्यक्षात ५३ जागा मिळाल्या होता. तर दिल्लीतील निवडणुकीत भाजपाला २९ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. पण त्यावेळी भाजपाला केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे या सर्वेक्षण अहवालाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या