हल्ल्याच्या निषेधार्थ उपोषणाचं आवाहन

परळ - राज्यातील शिक्षकांनी 13 ऑक्टोबरला एक दिवसीय उपोषण करावं, असं आवाहन शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ आदी सात संघटनांनी केलं आहे. परळमधल्या पोयबावाडी शाळेत याबाबत सभा आयोजिण्यात आली होती. या सभेत हा निर्णय घेण्यात आाला. औरंगाबादमध्ये शिक्षकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी एक दिवसीय उपोषण करण्यात येतंय. या वेळी आमदार कपिल पाटील, विधान परिषद सदस्य सुधीर तांबे, विक्रम काळे, निरंजन डावखरे, दत्तात्रय सावंत आदी उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या