जहाज तोडणी कामगारांची निदर्शने

शिवडी - जहाज तोडणी कामगारांनी कंत्राटपद्धतीविरोधात आणि विविध मागण्यांसाठी निदर्शने केली. पोर्ट ट्रस्ट, डॉक अँन्ड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने शिवडीच्या दारूखाना येथे ही निदर्शने करण्यात आली. इंडस्ट्री ऑलतर्फे 140 देशांमध्ये 7 ऑक्टोबर हा प्रिकेरिअस डे म्हणून साजरा केला जातो. त्याचाच भाग म्हणून या कामगारांनी ही निदर्शने केली. केंद्र सरकारच्या धोरणांनुसार सार्वजनिक उद्योग कंत्राटपद्धतीमुळे कामगारांचे शोषण होते. त्यामुळे ही कंत्राटपद्धत थांबवावी अशी मागणी या कामगारांनी केली. यावेळी युनियनचे पदाधिकारी विजय रणदिवे, रतनकुमार झाजम, लहू कोकणे यांच्यासह 500 जहाज तोडणी कामगार उपस्थित होते.

     कामगारांच्या मागण्या

  • कंत्राटी कामगारांना कायम करावे
  • भविष्य निर्वाह निधी कापावा
  • किमान वेतन मिळावे
  • निवृत्ती वेतन मिळावे
  • कामाच्या ठिकाणी सामाजिक सुरक्षा असावी
  • अपघात झाल्यावर कायद्यानुसार नुकसानभरपाई मिळावी
  • कंत्राटपद्धत नष्ट करणे
  • बेरोजगारांना रोजगार द्या
  • कामाचे आठ तास करा
  • पिण्याचे पाणी शौचालये उपलब्ध करून द्या
  • राहण्यासाठी जागा द्या
  • वैद्यकीयसुविधा पुरवा
पुढील बातमी
इतर बातम्या