प्रभाग 223मध्ये अनुभवी विरूद्ध नवखे सामना

सँडहर्स्ट - येथील बी विभागातील प्रभाग क्रमांक 223 हा महिलांसाठी राखीव झाल्याने अनुभवी विरूद्ध नवखे असा सामना पाहायला मिळणार आहे. समाजवादी पक्षाच्या नवख्या असलेल्या सईदा फातिमा यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेनेकडून या विभागात विजयश्री साखरे या निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. विजयश्री साखरे यांचे वडील नगरसेवक राहिल्याने त्यांच्याकडे निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे. तर सईदा फातिमा या नवख्या उमेदवार नशिब आजमावणार आहेत. त्यामुळे जुने विरूद्ध नवखे असा सामना या प्रभागात रंगणार आहे. मागील निवडणुकीची स्थिती पाहता समाजवादी पक्ष हा दुसऱ्या स्थानावर होता. तर शिवसेना तिसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे समाजवादीच्या उमेदवार नवख्या असल्या तरी त्यांनी थोडाफार फायदा होण्याची शक्यता आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या