'भारत बंद'नंतरही पेट्रोल दरवाढ काही थांबेना!

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी सोमवारी 10 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. मात्र तरीही पेट्रोल आणि डीजलचे दर कमी होताना दिसत नाही. तर पेट्रोल 23 पैशांनी आणि डिझेलच्या दरात 22 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 88.12 रुपये तर डिझेल 77.23 रुपयांवर पोहोचले आहे. 

बंदनंतरही...

पेट्रोल, डिझेल गॅस दरवाढ आणि त्यामुळे वाढलेल्या महागाईविरोधात काँग्रेससह देशातील विरोधी पक्षांनी सोमवारी 'भारत बंद' पुकारला. या बंदमध्ये सहभागी असलेल्या विविध पक्षाच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरत ठिकठिकाणी निषेध मोर्चा काढला. तर हा बंद शांततेच्या मार्गाने करणार असल्याचंही जाहीर केलं. मात्र याचा कोणताच परिणाम होताना दिसत नाही. उलट पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोजच्याप्रमाणे सोमवारीही वाढ झाली.

काँग्रेसची मागणी

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत सहज टाकता येऊ शकतं. त्यामुळे सरकारने इंधनाचे दर कमी करून सर्वसामान्यांची ही लूट तात्काळ थांबवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या