गुजरातचे राज्यपाल यांच्याकडे महाराष्ट्र राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्याने त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याबाबतचे निवेदन जारी केले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढले. ते रालोआचे उमेदवार होते. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार माजी न्या.बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला.

देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर निवड झाल्याने राधाकृष्णन यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपविला आहे. आ

चार्य देवव्रत आता गुजरातसोबत महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचाही कार्यभार पाहणार आहेत. आचार्य देवव्रत हे मूळचे हरयाणातील समालखा येथील आहेत. गुजरातचे राज्यपाल होण्याआधी ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते.

आचार्य देवव्रत कोण आहेत?

गुजरातचे राज्यपाल म्हणून काम करण्यापूर्वी, देवव्रत यांनी ऑगस्ट 2025 ते जुलै 2019 पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. जुलै 2019 मध्ये त्यांनी गुजरातचे राज्यपाल म्हणून काम सुरू केले.

नॅशनल पोर्टल ऑफ इंडियावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, देवव्रत यांच्या अनेक शैक्षणिक पात्रतांमध्ये इतिहास आणि हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी, शिक्षणात पदवी, योग विज्ञानात डिप्लोमा यांचा समावेश आहे. ते निसर्गोपचार आणि योगिक विज्ञानात डॉक्टर देखील आहेत.

ते वैदिक मानवी मूल्ये आणि वैदिक तत्वज्ञानावर व्याख्याने देखील देतात. त्यांनी नैसर्गिक शेती आणि गोवंश सुधारणेबद्दल जागरूकता पसरविण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात काम केले आहे.


हेही वाचा

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्र्यांनी केली चर्चा

शिवाजी पार्कवर ठाकरेंना दसरा मेळाव्याला परवानगी

पुढील बातमी
इतर बातम्या