गुमास्ता कामगार संपावर जाणार

मुंबई - दक्षिण मुंबईतील गुमास्ता कामगार विविध मागण्यांसाठी १४ ऑक्टोबरपासून संपावर जाणार आहेत. मुळजी जेठा मार्केट, मंगलदास मार्केट, स्वदेशी मार्केट, काकड मार्केट, आर जे मार्केट या पाच बाजारांमधील गुमास्ता कामगार या संपात सहभागी होणार आहेत.

गुमास्ता संघटना व व्यापारी असोसिएशन यांच्यात गुमास्ता कामगारांच्या मागण्यांबाबत सामंजस्य करार करण्यात आला होता. मात्र 2007 पासून मालकवर्गाने आडमुठे धोरण स्वीकारल्यामुळे गुमास्ता कामगारांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नाही. त्यानंतर 20 ऑक्टोबर 2015 ला कापड मार्केट बंद करण्यात आले. त्यावेळी कापड बाजारातील मालक असोसिएशनने मागील थकबाकी न देता एकरकमी पैसे देण्याचे मान्य केले. त्यानंतर आजतागायत मालकवर्ग असोसिएशन करार करण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे गुमास्तांच्या सर्वसाधारण मागण्या मान्य होईपर्यंत 14 व 15 ऑक्टोबरला कापड मार्केट बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा मुंबई गुमास्ता कामगारांच्यावतीने देण्यात आला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या