मनसेच्या 'त्या' ६ नगरसेवकांची सुनावणी टळली

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या ६ नगरसेवकांची सोमवारी कोकण आयुक्तांसमोर सुनावणी होणार होती. परंतु कोकण आयुक्त रजेवर असल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. यावेळी शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचे वकील उपस्थित होते. कोकण आयुक्त जगदीश पाटील सलग सहाव्यांदा अनुपस्थित राहिल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.

मनसेचं आव्हान कोकण आयुक्तांकडे

मनसेतून दिलीप लांडेंच्या नेतृत्वाखाली ६ नगरसेवक शिवसेनेत गेले. त्याला मनसेने कोकण आयुक्तांकडे आव्हान दिलं आहे. हा निकाल तीन महिन्यात येणं अपेक्षित होतं. पण चार महिने उलटून गेले तरी आयुक्त गैरहजर राहत असल्याने त्यांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्नर कदम, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

कोकण आयुक्त हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातचं बाहुलं बनले आहेत. कोकण आयुक्त उच्च न्यायालयाच्या नियमांचं पालन करत नाहीत.

संदीप देशपांडे, मनसे नेते

पुढील बातमी
इतर बातम्या