पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाचे जलपूजन

मुंबई – महाराष्ट्रासाठी 24 डिसेंबर हा ऐतिहासिक दिवस ठरला. कारण जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या स्मारकाचं 24 डिसेंबरला म्हणजेच शनिवारी जलपूजन झालं. मुंबईतील अरबी समुद्रात बांधल्या जाणाऱ्या भव्यदिव्य शिवस्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी विद्यासागर राव, खासदार उदयनराजे, खासदार संभाजीराजे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी दोननंतर गिरगाव चौपाटीवर पोहचले. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांतील गड, किल्ले आणि पवित्र नद्यांमधील एकत्र केलेले पाणी आणि माती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नरेंद्र मोदी यांनी स्वीकारलं. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन जलपूजन केले. त्यांनी यावेळी समुद्रात तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या स्मारकाला प्रदक्षिणाही घातली.

पुढील बातमी
इतर बातम्या